Breaking News

वडझिरे येथून मोटरसायकलची चोरी !

वडझिरे येथून मोटरसायकलची चोरी


पारनेर प्रतिनिधी -
     पारनेर तालुक्यातील वडझिरे येथून एका बुलेट मोटर सायकलची अज्ञातांनी चोरी केल्याची घटना घडली आहे याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अतुल नामदेव मोरे वय 19 वर्ष धंदा शेती राहणार वडझिरे ता.पारनेर,जिल्हा अ. नगर यांचे मालकीची त्यांचे घरासमोर लावलेली 58,000रू.किं.ची रॉयल ईनफिल्ड 350 मॉडेल ची काळ्या रंगाची बुलेट मोटारसायकल क्रमांक mh 16 cr 5432 बुलेट मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी संमतीशिवाय लबाडीचा इराद्याने चोरून नेलेली आहे
     पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाता विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल उजागरे करत आहेत