Breaking News

कोपरगाव राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल कडून जंतुनाशक वाटप करून आ काळे चा वाढदिवस साजरा!

कोपरगाव राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल कडून जंतुनाशक वाटप करून आ काळे चा वाढदिवस साजरा!
करंजी प्रतिनिधी-
   काल ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ आशुतोष काळे यांचा वाढदिवस होता परंतु कोपरगाव तालुक्यावर वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता आ काळे नी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी कोणत्याही कार्यकर्त्यानी येऊ नये असे आव्हान केले होते.
   कोपरगांव तालुक्याचे आमदार  आशुतोष काळे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील त्यांचा वर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यानी विविध सामाजिक उपक्रम राबवत त्याचा वाढदिवस साजरा केला असून कोपरगाव शहरातील
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मीडिया सेल कोपरगाव शहर अध्यक्ष  चंद्रशेखर म्हस्के यांनी कोपरगाव शहरातील  कोविड-19 केअर सेंटर, कोपरगाव नागरपरिषद, कोपरगाव ग्रामीण रुग्णालय, तहसिल कार्यालय, कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस स्टेशन या ठिकाणी जंतुनाशक फवारणीसाठी २५० लिटर सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन चे वाटप करत एक सामाजिक उपक्रम करत आ काळे यांचा वाढदिवस साजरा केला
या  सामाजिक उपक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनिल गंगूले, नगरपरिषदेचे गटनेते विरेन बोरावके, सोशल मीडिया पदाधिकारी आदर्श पठारे, शुभम लासुरे, ओंकार वढणे, आदित्य देशमुख, गौरव पंडीत यांचेसह सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.