Breaking News

भिंगार कँटोन्मेंट बोर्डचे प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळतंय, कचरा टाकला जातोय इंदिरा नगर लोकवस्तीत !

भिंगार कँटोन्मेंटचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष, कचरा टाकला जातोय इंदिरा नगर लोकवस्तीत.
------------
भिंगार कँटोन्मेंट बोर्डचे प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळतंय, त्यातच आरोग्याचा प्रश्न झाला गंभीर.!
------------
कोरोनाच्या संकटातही नागरिकांच्या सार्वजनिक स्वच्छतेकडे भिंगार कँटोन्मेंट बोर्डाचे दुर्लक्ष.
अहमदनगर/प्रतिनिधी :
       अहमदनगर कँटोन्मेंट बोर्ड, भिंगार येथील जुन्या बस स्थानका मागे इंदिरानगर वस्ती जवळ संपूर्ण भिंगार शहर व आसपास गावतील सर्व कचरा घंटा गाडीच्या सहायाने आणून टाकण्याचे काम गेली एक महिन्यापासून नियमित रित्या सुरू आहे. तसेच सर्व कचरा वस्ती जवळ पसरवण्याचे काम जेसीबीच्या सहायाने रोज करण्यात येत आहे. कचऱ्याच्या या अचूक व्यवस्थापनाने इंदिरा नगर, भिंगार वस्तीत गेली महिना भरापासून दुर्गंधी पसरलेली आहे आणि दिवसेंदिवस या दुर्गंधीचे प्रमाण देखील वाढत आहे. 
      यामुळे वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. बायका व लहान मुलांना पोटाचे विकार या महिन्यात जास्त प्रमाणात आढळून आले आहे. तसेच सर्व नागरिकांचे स्वास्थ धोक्यात येत आहे. या संदर्भात संबधित व्यक्तीशी इंदिरानर, भिंगार येथील नागरिकांनी चर्चा केल्यास त्यांना संबधित व्यक्ती कडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. अहमदनगर कँटोन्मेंट बोर्ड, भिंगार हे इंदिरानगर येथील नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून कचरा वस्ती जवळ आणून टाकण्याचे काम करत आहे.
        कोरोना, डेंग्यू, मलेरिया अशा रोगांची लागण देखील इंदिरानर भिंगार येथील वस्तीतील नागरिकांना होऊ शकते, याची दखल अहमदनगर कँटोन्मेंट बोर्ड भिंगार, यांनी घ्यावी. तसेच अहमदनगर शहर आरोग्य विभागाने या संदर्भात योग्य ते पाऊल उचलावे; अशी मागणी इंदिरानगर, भिंगार येथील नागरिक करत आहेत.

.....