Breaking News

लढवय्या नेता हरपला अनिल राठोड यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची श्रद्धांजली !

Balasaheb Thorat to take over as Maharashtra Congress chief
मुंबई । वृत्तसंस्था

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली

           शिवसेनेचे उपनेते आणि माजी मानती अनिल राठोड यांचं आज पहाटे निधन झालं. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहिली.
            अहमदनगर शहराचे पंचवीस वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व करताना माजी मंत्री अनिल भैया राठोड यांनी आपल्या कामाचा राज्यभर ठसा उमटवला. धडाडी व आक्रमकते बरोबर त्यांनी विकास कामांना कायम प्राधान्य दिले. गोरगरीब सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. 
            शिवसेनेतील राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असे त्यांच्या नेतृत्वाची ओळख ठरली .त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील गोरगरीब व जनसामान्यांचा लढवय्या नेता हरपला असल्याची भावना राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे