Breaking News

अकोले तालुक्यात कोरोनाने घेतला पाचवा बळी!

 अकोले तालुक्यात कोरोनाने घेतला पाचवा बळी!
अकोले प्रतिनिधी :
     अकोले तालुक्यात परवा मोग्रस येथील एकाचा करोना ने बळी  घेतल्या नतंर काल कोतुळ येथील एका सरकारी कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला यामुळे तालुक्यात कोरोना बळी ची संख्या पाच झाली आहे.
      कोतुळ येथील  रहिवासी असलेली सरकारी सेवेत  असणारी ही व्यक्ती सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजूर येथे  स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून सेवारत  होती या  व्यक्तीचा संगमनेर येथे एका खाजगी  रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला . दिनांक 7 ऑगस्ट रोजी त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने संगमनेर येथील खासगी लॅब मध्ये त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या. शनिवारी त्यास अधिक अधिक त्रास झाला त्यातच रात्री त्याचा मृत्यू झाला अल्पसेवेतच लोकप्रिय ठरलेल्या या सरकारी कर्मचाऱ्याच्या अचानक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे .तालुक्यात कोरोना   बधितांची रुग्ण संख्या २०५ झाली  आहे अद्याप ४० ते ४५ जणांचे करोना अहवाल येणे बाकी आहे.५६ जणांनी करोना वर  मात केली असून सध्या ४० रुग्ण उपचार घेत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ इंद्रजित गंभीरे यांनी सांगितले