Breaking News

शिक्षकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

शिक्षकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल !


पारनेर प्रतिनिधी-
     पारनेर तालुक्यातील लोणीमावळा ते आळकुटी रोडवर मोटर सायकल वरून जात असताना एका शिक्षकाला कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत एका कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोणीमावळा ते आळकुटी रोडवर घोलप मळ्याजवळ साहेबराव नानासाहेब गोरडे वय 55 वर्ष  शिक्षक राहणार लोणीमावळा मोटर सायकल MH16 B.T.5836 ही वरून आळकुटी कडून लोणीमावळा कडे जात असताना हिला हुंडाई कार एम एच 01 M.आहे 9632 वरील चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हयगयीने, अविचाराने,  भरधाव वेगात चालवून मोटरसायकल ला  पाठीमागून जोराची धडक देऊन   साहेबराव गोरडे यांच्या मृत्यूस  कारणीभूत झाला आहे व अपघाताची खबर न देता निघून गेला.
        याबाबतची फिर्याद मयत शिक्षकांचे भाऊ कैलास नाना साहेब गोरडे  वय 48 रा. लोणीमावळा ता.पारनेर,अ. नगर यांनी दिली आहे त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल उजागरे करत आहेत.