Breaking News

छत्रपती युवा सेनेच्या वतीने मराठा आरक्षण संबंधी शासनास निवेदन !

छत्रपती युवा सेनेच्या वतीने मराठा आरक्षण संबंधी शासनास निवेदन
करंजी प्रतिनिधी-
छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर उपजिल्हाध्यक्ष संजय शिंदे यांच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी मा मुख्यमंत्री, मा उप मुख्यमंत्री, मा मराठा समाज आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांना कोपरगावचे निवासी नायब तहसिलदार योगेश कोतवाल यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
   छत्रपती युवा सेनेच्या वतीने या निवेदनाद्वारे सरकारला विनंती करण्यात आली आहे की आपले सरकार आल्या पासून जाणीवपूर्वक आपण मराठा समाज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहात असे आमच्या निर्देशनास आले आसून आता मराठा समाज हे कदापी खपून घेणार नाही, ज्या प्रमाणे मागील सरकारने दिलेले मराठा समाजाला आरक्षण हे जसे उच्च न्यायालयातील खटल्यात पास झाले तसे आता सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या मराठा आरक्षण संबंधी खटल्यात महाराष्ट्र सरकारने आरक्षण मिळणे संबंधी शासनाकडून योग्य ते पुरावे सादर करत मराठा आरक्षणाच्या वतीने बाजू मांडून आरक्षण मिळून द्यावे अन्यथा छत्रपती युवा सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज्याच्या मागण्याकरिता मोठे आंदोलन करण्यात येईल याची दखल शासनाने  वेळेत घ्यावी. 
   या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे, कोपरगाव तालुका अध्यक्ष संकेत दहे,उपतालुका अध्यक्ष योगेश आगवन यांच्या सह्या आहेत.