Breaking News

नेवासा तालुक्यात आज दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह १३ रुग्णांची वाढ, तर १८ रुग्णांनी केली कोरोनावर मात !

नेवासा तालुक्यात आज दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह १३ रुग्णांची वाढ, तर १८ रुग्णांनी केली कोरोनावर मात ! 
नेवासा तालुका प्रतिनिधी :
      नेवासा तालूक्यात कोरोना या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव मोठा वाढत चालला आहे. मंगळवार (दि.४) रोजी तालूका आरोग्य विभागाला आलेल्या अहवालात तालुक्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह १३ रुग्ण कोरोनाच्या संसर्गाला बळी पडले असून १८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तालूक्यातील नेवासा शहरात ९,नेवासा बुद्रूक १,मांडेगव्हाण १,माळिचिंचोरे १ तर चांदा येथे एका रुग्णांची वाढ झालेली आहे. दोन पोलिस कर्मचारी पुन्हा एकदा बाधित झाल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
      नेवासा तालूका आरोग्य विभागाला आलेल्या आहवालात आजपर्यंत तालूक्यातील २६४ रुग्णांपैकी १४४ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आसून ११४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहीती तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी दिली. तर यापुर्वी कोरोनावर 
उपचार घेत असलेल्या सहा जणांचा मृत्यु झाल्याचेही अहवालात नमुद करण्यात आलेले आहे.
        नेवासा तालूक्यातील एका पोलिस दलातील जवानाचा सोमवारी मृत्यु झालेला आसतांना पुन्हा मंगळवार (दि.४) रोजी दोन पोलिस कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने पोलिस दल कोरोनाच्या धास्तीने पुरता घायाळ झाला आहे.त्यामुळे कोरोना हा संसर्गजन्य आजार तालूक्याचा पिच्छाच सोडत नसल्याचे दिसून येत असून आरोग्य विभागाने सतर्क होण्याबरोबरच प्रशासनाने सार्वजनिक गर्दी व सोशल डिस्टंन्सचा नियम कडक करणे गरजेचे आहे अन्यथा रोग आटोक्यात येण्याऐवजी त्याचा फैलाव वाढण्याची अधिक शक्यता नाकारता येत नसल्याचे दिसून येत आहे.                      
    आजच्या कोविड सेंटरमधील रॅपिड टेस्टमध्ये सात वर्षांची चिमुकली कोरोना बाधित येताच आईला बिलगून  चिमुकलीने हंबरडा फोडण्यास सुरुवात केल्यामुळे आईसह  उपस्थितांचे डोळे पाणावले होते.