Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाने घेतले सहा बळी, आज तालुक्यात कोरोनाचे दोन बळी !

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाने घेतले सहा बळी, आज तालुक्यात कोरोनाचे दोन बळी
 श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी
      श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होतो आहे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालल्याने तालुक्यासह प्रशासनाची चिंता वाढतच चालली असुन यातच श्रीगोंदा शहरातील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला तर पिंपळगाव पिसा अंतर्गत खरातवाडीतील ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला या दोन व्यक्ती मिळुन आता तालुक्यातील मृत्युंची संख्या सहा वर पोहचली आहे.
   आज तालुक्यात सर्वाधिक २०० टेस्ट करण्यात आल्या यामध्ये एकुण १९ रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली यात श्रीगोंदा शहर ससाणेनगर १, शाहुनगर २, म्हातारपिंप्री ८, काष्टी २, पेडगाव २, कोंडेगव्हाण १, लिंपणगाव १, टाकळी लोणार १, घारगाव १ श्रीगोंदा तालुक्यात एकूण रुग्णसंख्या ३५१ इतकी झाली आहे. सध्या १०५  रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर २४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. अशी माहिती डॉ नितीन खामकर यांनी दै. लोकमंथनशी बोलताना दिली.