Breaking News

लालबाग साार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 'आरोग्योत्सव'

 Lalbaugcha Raja Ganpati Mandal celebrating its Arogya Utsav ...

मुंबई : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २९ लाख ७५ हजार ७०२ इतकी झाली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक मोठ्या गणेश मंडळांनी देखील यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही मंगळांमध्ये आरोग्य शिबिर भरवली जाणार आहे. तर कोरोना हे संकट लवकरात-लवकरत दूर होईल अशी प्रार्शना आज प्रत्येक भक्त करत आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यावर्षी 'आरोग्योत्सव' आयोजीत करण्यात आला आहे. त्यानिमीत्ताने विविध सामाजिक ऊपक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. मंडळाचे हे ८७वे वर्ष आहे.

३ ऑगस्टला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्योत्सवाची सुरुवात झाली असून ३१ ऑगस्ट रोजी 'आरोग्योत्सव' सांगता होणार आहे. यंदा देशावर करोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा मोठा उत्सव अगदी साध्या पद्धतीने करताना दिसत आहे.

चैतन्याच्या, आनंदाच्या या उत्सवात सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान ठेवून हा सण साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून केले जात आहे.