Breaking News

कोपरगावात घरोघरी आरोग्य तपासणीत १७२९ कुटूंबाची तपासणी !

कोपरगावात घरोघरी आरोग्य तपासणीत १७२९ कुटूंबाची तपासणी


करंजी प्रतिनिधी :
-कोपरगाव तालुक्यातील वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता ही वाढती साखळी तोडण्यासाठी कोपरगाव शहर चार दिवस बंद ठेऊन
कोपरगावाआरोग्य विभागातर्फे शहरातील उपनगरात ज्या भागात जास्त संख्या वाढतेय अशा सर्व विभागाची घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करत आज गांधीनगर गोरोबनगर व महादेवनगर या भागातील सुमारे १७२९ कुटुंबातील ९७०० च्या आसपास नागरिकांची घरोघरी जावून तपासणी करण्यात आली आहे. त्यात ८१ व्यक्तीना कोरोनाची लक्षणे दिसली त्या त्यांची रँपिड अँटीजन किट द्वारे तपासणी करण्यात आली त्यात ६ नागरिक कोरोना पाॅझिटिव्ह आढळुन आले आहे. या आरोग्य विभागाच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णयामुळे दररोज कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची संख्या वाढतांना दिसेल परंतु या मुळे वाढती कोरोना साखळी लवकर तोडण्यास मदत नक्कीच होऊ शकते.