Breaking News

साई मंदिर खुले करा, अन्यथा कोर्टात जाऊ!

- खा. सुजय विखे यांचा सरकारला इशारा

- राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे यांची राज्य सरकारकडे मंदिरे खुली करण्याची मागणी

Sujay vikhe patil meet shivsena pramukh uddhav thackerayAapla ...

अहमदनगर/ खास प्रतिनिधी

माजीमंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. शिर्डीचे साई मंदिरही खुले करावे अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा, सुजय विखे यांनी दिला आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा कारखाना येथे सपत्नीक श्री गणेशाची विधीवत स्थापना केली. यावेळी सुजय विखे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ तसेच सभासद यावेळी उपस्थित होते. साई मंदिरासह इतरही मंदिरे खुले करण्याची मागणी विखे पिता-पुत्रांनी केली. राज्य सरकारने मॉल उघडले, व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली, त्यामुळे मंदिरे बंद ठेवणे उचित नाही. आवश्यक उपाययोजना करणार्‍या सर्वच मंदिरांना आता खुले करा, त्यामुळे परिसरातील रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. शिर्डीचे सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार, देशातील तिरुपती, वैष्णोदेवी मंदिर सुरु झाले. शिर्डी संस्थान आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. ऑनलाईन दर्शन सुविधा असल्याने मंदिर सुरु करणे सोयीस्कर असून, गर्दी न होता ठराविक संख्येने भाविकांना दर्शन देणे शक्य आहे. सर्व ग्रामस्थांच्यावतीने मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. मात्र सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचे सुतोवाच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

--------------------