Breaking News

कर्जतमधील पोलीस व आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह !

कर्जतमधील पोलीस व आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत :
    कर्जतच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ३२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल रात्री आलेल्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे. जनतेची सेवा करत असलेल्या कोरोना योद्ध्यांनाच कोरोनाची बाधा झाल्याने कर्जत तालुक्यातील चिंता अधिक वाढली आहे.
     कर्जत तालुक्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या चिंतेची बाब झाली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नवीन गावांचा यात समावेश होत असल्याने ग्रामीण भाग हादरून गेला आहे. आरोग्य, पोलीस, महसूल, पंचायत समिती आदी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र कित्येक ठिकाणी नागरिकांकडून शासन नियमांचे उल्लंघन होत नसल्याने रुग्ण संख्या वाढत चालली आहे.

पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आज इतर पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
-----------
डॉ. संदीप पुंड, तालुका आरोग्य अधिकारी