Breaking News

अकोले,राजुर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

अकोले,राजुर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !
राजूर प्रतिनिधी :
     आज अकोले तालुक्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात व आदिवासी प्रकल्प कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  आमदार डाॅ.किरण लहामटे यांच्या उपस्थित आज हा छोटेखानी कार्यक्रम साजरा करण्यात आला.दरवर्षी अकोले तालुक्यात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा केला जातो.माञ या वर्षी कोरोनामुळे जागतिक आदिवासी दिन साजरा करणे शक्य झाले नाही
     आदिवासी समाजाच्या वरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी जगाचे लक्ष वेधण्यासाठी. "लीग ऑफ नेशन्स" च्या जनरल असेंब्लीद्वारे दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन "जागतिक लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस" ​​साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, ९ ऑगस्ट रोजी, अमेरिकन खंड, आफ्रिकन खंड आणि आशिया खंड अशा संपूर्ण जगाच्या आदिवासी बहुल देशांमध्ये "जागतिक आदिवासी दिन" मोठ्याने साजरा केला जातो, ज्यात भारताचा देखील प्रमुख समावेश आहे.   .राजुर,कोतुळ,समशेरपुर, अकोले येथे आदिवासी वस्तूंचे हा कार्यक्रम साजरा केला जात असतो.गेल्या तीन वर्षापासुन आदिवासी नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी भव्य स्वरुप दिले गेले होते.अकोले शहरातुन मिरवणूक व "एक तीर एक कमान, ,सारे आदिवासी एक समान"घोषणांनी दुमदुमत असतो.आदिवासी समाज्यातील युवक वर्ग वर्षभर या दिवसाची वाट बघत असतो.माञ कोरोनामुळे युवकांनी सोशल मिडियाच्या फेसबुक लाईव माध्यमातुन आदिवासी लोककला,नृत्य सादर केल्या.आज अकोले राष्ट्रवादी कार्यालयात विर बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक विर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला  आमदार डाॅ किरण लहामटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व प्रतिमेचे पुुुुजन करण्यात आले
 पुप्षहार अर्पण करुन पुजन करण्यात आले.यावेळी अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे,एम.एम. लांघी,वाळु घोंगडे,मारूती भांगरे साहेब,लोंखडे तात्या,हरीभाऊ अस्वले,मारुती शेंगाळ, बाबासाहेब भांगरे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

     आदिवासी समाज हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे.आदिवासी शौक्षणिक,राजकीय,आर्थिक, सामाजिक उन्नती होण्यासाठी आदिवासी भागात पर्यटन,लोककला,आदिवासी नृत्य संवर्धन करणे गरजेच आहे.आदिवासी समाज्याचा आर्थिक स्तर उंचवावा या साठी मी नेहमीच प्रयन्नशिल आहे.जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा देतो.
---------
आमदार डाॅ.किरण लहामटे