Breaking News

एकनाथ खडसेंनाही वाढीव विजबिलाचा 'शॉक' !

 Revenue Minister Eknath Khadse Phone Number Seen In Dawood Ibrahim ...

जळगाव | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महावितरणने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. विजेचा कमी वापर होऊन सुद्धा सर्वसामान्यांना महावितरणकडून अव्वाच्या सव्वा बिले पाठवण्याचा प्रकार समोर आला असतांनाच आता याचा फटका राजकीय नेत्यांनाही बसल्याचे चित्र आता दिसत आहे. जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी भाजप नेते एकनाथ खडसे यांना तब्बल 1 लाख 4 हजार रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. हे बिल एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे आहे. वापर कमी असूनही ऐवढे वीज बिल आल्याने एकनाथ खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याप्रकरणी राज्य सरकारने चौकशी करावी तसेच बिलात सूट दिली गेली पाहिजे, अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे. याबाबत एकनाथ खडसेंनी प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, लॉकडाउनच्या या काळात येणारी वीज बिले अवास्तव असून ती न भरण्यासारखी आहेत. अशा पद्दतीने महावितरणने लोकांना वेठीस धरु नये. अवास्तव बिलांची राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे. तसेच वाढीव बिलामध्ये सवलत दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

दरम्यान उच्च न्यायालयाने बुधवारी लॉकडाननंतर आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे आदेश आपण देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच याप्रकरणी तक्रार निवारण मंचाकडे ग्राहकांनी दाद मागण्याच्या आपल्या निर्देशांचा पुनरूच्चार केला. त्याचबरोबर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वीज नियामक मंडळ तसेच वीजपुरवठादार कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रारींवर विलंब न करता तातडीने निर्णय देण्याचे आदेशही दिले.