Breaking News

पोलीस असल्याचे सांगून महिलेचे एक तोळ्यांचे दागिने लंपास !

पोलीस असल्याचे सांगून महिलेचे एक तोळ्यांचे दागिने लंपास.
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव  तालुक्यातील कोळपेवाडी येथील महिलेचे एक तोळ्यांचे दागिने पोलीस असल्याचे सांगून भर दिवसा लुटून नेल्याने कोळपेवाडी माहेगाव देशमुख परिसरात नागरिका मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे .
    या बाबत सविस्तर वृत्त असे की कोळपेवाडी येथील रहिवासी केसरबाई राधाकीसन मोरे यांचे फरसाण फळ विक्री चे दुकान कोपरगाव - कोळपेवाडी मार्गावर तीन महिन्या पासून माहेगाव देशमुख  मारुती मंदिर शेजारी चालू  करण्यात आले होते रविवारी दुपारी अडीच च्या सुमारास कोपरगावच्या दिशेने मोटार सायकल वरून दोन तरुण दुकाना पुढे येऊन थांबले त्या वेळी केसरबाई दुकानात  एकट्याच होत्या सफरचंद व केळी ची खरेदी तरुणांनी करत पन्नास रुपयाची नोट त्यांना दिली बोलण्यात गुंतवून ठेवत आम्ही पोलीस असल्याचे सांगत गुंगी चे औषध केसरबाई यांच्या तोंडावर मारले त्या वेळी त्यांचा
गळ्यातील आठ ग्रॅमचे डोरले व कानातील दोन ग्रॅमचे टापसे काढायला लावून कागदाच्या पुढ्यात बांधावयास लावले हात चलाखी करत दागिन्यांचा पुडा स्वता कडे घेत दुसरा पुडा
केसरबाई यांना देत चोरटे कोपरगाव च्या दिशेने फरार झाले गुंगी उतरल्या नंतर केसरबाई यांनी पुडा उघडून बघितला असता त्यात खडे असल्याचे आढळून आले आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येई पर्यंतचोरटे पसार झाले होते पोलीस असल्याचे सांगून गुंगी चे औषध फवारून लुट करणारी टोळी तालुक्यात सक्रिय झाली की काय या भीतीने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले  आहे