$type=ticker$snippet=hide$cate=0

गौतम बँकेच्या उपाध्यक्षपदी धोंडीराम वक्ते.

गौतम बँकेच्या उपाध्यक्षपदी धोंडीराम वक्ते. गौतम सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी धोंडीराम वक्ते यांच्या निवडीप्रसंगी त्यांचा सत्कार ...

गौतम बँकेच्या उपाध्यक्षपदी धोंडीराम वक्ते.
गौतम सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी धोंडीराम वक्ते यांच्या निवडीप्रसंगी त्यांचा सत्कार करतांना आमदार आशुतोष काळे समवेत बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ आदी.
                 
कोपरगाव प्रतिनिधी  –
 महाराष्ट्रात नागरी सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य असणा-या कोपरगाव तालुक्यातील गौतम सहकारी बँकेचे कुशल नेतृत्व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सभेमध्ये बँकेचे विद्यमान संचालक धोंडीराम दामू वक्ते यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर धोंडीराम वक्ते यांची निवड करण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मुख्य कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत उपाध्यक्ष पदासाठी मावळते उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी धोंडीराम वक्ते यांच्या नावाची सूचना मांडली. सदर सूचनेस संचालक साहेबलाल शेख यांनी अनुमोदन दिले व एकमताने धोंडीराम वक्ते यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते यांचे बँकेचे मार्गदर्शक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे, बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल बोलतांना धोंडीराम वक्ते म्हणाले की, माजी खासदार स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कारखान्या बरोबरच स्थापन केलेल्या सर्वच सहकारी संस्था माजी आमदार अशोकराव काळे यांनी सातत्याने प्रगतीपथावर ठेवून कारखाना परिसराचा विकास साधला. हि जबाबदारी आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या खांद्यावर घेवून माजी आमदार अशोकराव काळे यांचा कित्ता गिरवत गौतम सहकारी बँकेला आपल्या कुशल नेतृत्वातून प्रगतीच्या यशोशिखरावर घेवून जात आहेत. आज बँकेची परिस्थिती अतिशय चांगली असून मोठ्या प्रमाणात ठेवीदार बँकेत ठेवी ठेवत आहेत.अशा आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेल्या गौतम बँकेच्या उपाध्यक्ष पदावर काम करण्याच्या मिळालेल्या संधीतून आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, बँकेचे मुख्य व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड, व सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते यांचे अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पहिले.  

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: गौतम बँकेच्या उपाध्यक्षपदी धोंडीराम वक्ते.
गौतम बँकेच्या उपाध्यक्षपदी धोंडीराम वक्ते.
https://lh3.googleusercontent.com/--AFWLSJzA9I/Xy576d0Ej0I/AAAAAAABe9A/5fbIyT77VHkbFfzTONNrnmIaKFRTb1uFwCLcBGAsYHQ/s1600/1596881880342007-0.png
https://lh3.googleusercontent.com/--AFWLSJzA9I/Xy576d0Ej0I/AAAAAAABe9A/5fbIyT77VHkbFfzTONNrnmIaKFRTb1uFwCLcBGAsYHQ/s72-c/1596881880342007-0.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_142.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/08/blog-post_142.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content