Breaking News

सुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद !

सुरेगाव परिसरात बकरी ईद घरीच साजरी होणार -डॉ. सय्यद 

कान्हेगाव/प्रतिनिधी :
मुस्लिम धर्माचा पवित्र बकरी ईद सण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने  हा सण घरीच साजरा करण्याचे आवाहन  सुरेगाव ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य डॉ. आय. के. सय्यद यांनी केले आहे .
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ,कोळपेवाडी ,कोळगावथडी व शहाजापूर  परिसरात पोलीस प्रशासनाने  मुस्लिम बांधवांना योग्य प्रकारे सुचना केल्या आहेत.   मुस्लिम पंच कमिटिने  मस्जिद येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत मुस्लिम समाजातील मौलाना,प्रमुख पदाधिकारी तसेच मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रका प्रमाणे बकरीईद साजरी करण्याबाबत सूचना देऊन आपापल्या घरी नमाज पठण करण्याबाबत शासन आदेशाची माहिती दिली. कुर्बानी करताना सुद्धा सार्वजनिक ठिकाणी न करता आपापल्या घरातच करावी असे सांगितले.