Breaking News

लग्नानंतर दोनच महिन्यात झाला घटस्फोट, अकोले तालुक्यातील आंभोळ येथील घटना !

लग्नानंतर  दोनच महिन्यात झाला घटस्फोट, अकोले तालुक्यातील आंभोळ येथील घटना
अकोले  प्रतिनिधी :
      जगलात शेळ्या चारणाऱ्या तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या  चुलत भावावर  अकोले पोलिसांत  गुन्हा दाखल झाला आहे. अकोले तालुक्यातील आंभोळ  येथील ही घटना  आहे.
      सदर तरुणीने दिलेल्या फिर्यादी नंतर हा प्रकार उघडकीस आला आहे   दोन महिन्यांपूर्वी या तरुणीचा  विवाह झाला होता विवाहाचे नंतर काही दिवसातच या नवविवाहितेला उलट्या झाल्या  सासरच्यां  ना शंका आल्याने  त्यांनी या नवविवाहितेची अकोले येथे सोनोग्राफी केली यात ही नवं विवाहित तरुणी साडेचार महिन्याची गरोदर असल्याचे आढळून आले लग्ना पूर्वीच नवविवाहित तरुणी गरोदर झाल्याचे  समजताच   सासरच्यांनी तिच्या नातेवाईकांना  बोलावून या नवविवाहित तरुणीला घटस्फोट दिला  त्यानंतर या साऱ्या प्रकारचे बिंग फुटले  आणि घडला प्रकार  या तरुणीने पोलिसांना सांगितला  तरुणीच्या फिर्यादी वरून  तिचा चुलत भाऊ  सचिन बाळू भवारी याचे वर  गुन्हा दाखल केला आहे
     20 वर्ष वयाच्या या  तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की   मी व माझी आई , भाऊ  असे सोबत राहतो मी इयत्ता नववी पर्यंत आंभोळ येथील आम्लेश्वर विद्यालयात शिक्षण घेतले असुन नंतर मी आमचे घरातील शेळ्या चारण्यासाठी जंगलात घेवुन जात असे माझे लग्न कारभारी लालु भोजने रा भोजनेवाडी ता अकोले यांचेशी ठरले होते मागील वर्षी सन 2019च्या दिवाळी दरम्यान मी एक
दिवस आमचे शेळ्या घेवुन जंगलात चारण्यासाठी घेवुन गेली असता मी जंगलात एकटी शेळ्या चारत असताना सदर ठिकाणी सचिन बाळु भवारी हा तेथे आला व तो मला बोलला की तु मला खुप आवडते मला तुझ्या सोबत संबध करायचे आहे मी त्याला बोलले की तु माझा चुलत भाऊ आहे
व माझे लग्न ठरले आहे तु वेडा झाला आहे असे बोलुन मी त्याला शिवीगाळ केली पंरतु त्याने मला जबरदस्तीने खाली पाडुन माझेशी शारीरीक  संबंध केले व मला बोलला  की तु जर कोणाला सागितले तर तुझं लग्न मोडुन जाईल व मी तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली मी संध्याकाळी घरी आले पण घरातील लोंकाना सागितले नाही काही दिवसांनी परत सचिन भवारी हा मी  शेळ्या चारण्यासाठी जंगलात घेवुन जात असताना तो माझा पाठलाग करुन जंगलात आला माझेवर जबरदस्तीने शारिरीक संबध केला व तो पुढेही माझेवर जंगलात शारीरीक
संबंध करीत होता त्यातच मला दिवस राहिले मी त्याला बोलले की तु मला तुझ्यापासुन दिवस राहिले आहे त्यावेळी सचिन भवारी बोलला की लग्न आता होणार आहे सदर बाब ही झाकुन जाईल असे बोलुन त्याने माझी समजुत काढली माझे लग्न कारभारी लालु भोजने याचेशी जुन 2020 ला 
झाले लग्न झाले नंतर पंधरा दिवसांनी मला वांती झाली त्यामुळे माझ्या घरच्याना माझेवर संशय आल्याने त्यांनी माझी सोनोग्राफी केली त्यात मी गरोदर असल्याचे  आढळले  त्यांनी
माझे नातेवाईकांना बोलावून माझेशी घटस्फोट करुन घेतला घरी गेल्यावर मला माझा भाऊ  आई यानी विचारपुस केलीअसता त्यावेळी मी माझे सोबत घडलेला संपूर्ण प्रकार सागितला 
व आज  रोजी  मी अकोले पोलीस स्टेशनला सचिन बाळू भवारी याचे विरुध्द तक्रार  दिली आहे यावरून अकोले पोलिसांत गुन्हा रजिस्टर न 360/2020  भारतीय दंड संहिता 1860 कलम 376(2)(n),506प्रमाणे गुन्हा दाखल केला असून  पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे पुढील तपास करत आहे
----