Breaking News

बहिणीला पळवून नेवून लग्न केले म्हणून सात जणांनी एकास केली मारहाण !

बहिणीला पळवून नेवून लग्न केले म्हणून सात जणांनी एकास केली मारहाण,
पारनेर पोलीस स्टेशनमध्ये ७ जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण गुन्हा दाखल.
पारनेर प्रतिनिधी-
     पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे आमच्या बहिणीशी लग्न का केले यावरून जातिवाचक शिवीगाळ करून एकास काठ्या बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनोद शंकर रोकडे वय -३५, रा. धोत्रे बु. ता. पारनेर जि. अ. नगर यास आरोपी नंदकुमार साहेबराव हारेल, अवधुत मगन हारेल, संदेश नारायण हारेल, सुनील शिवाजी हारेल, चंद्रकांत साहेबराव हारेल, अमोल मगन हारेल, किरण सुनील हारेल सर्व.धोत्रे बु पारनेर यांनी आमच्या बहिणीशी लग्न का केले जाती वाचक असे माहीत असुन देखील जातीवाचक शिवीगाळ करत माजला का तुला सांगितले की आमच्या नादी लागू नको बहिणीस पळवुन नेवुन लग्न केले म्हणून काठ्याने लाथा बुक्याने पोटात,तोंडावर,पाठीवर,पायावर,मारहान करुन शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत फिर्याद विनोद शंकर रोकडे यांनी दिली आहे त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये भादवि ३२४,३३२,१४३,१४७,१४९,१८८,५०४,५०६ अ. जा. ज. प्र.कलम ३(१)(r) (s)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत