Breaking News

पञकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा : उंडे

पञकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा : उंडे
---------- 
पञकार थोरात यांना वाळूतस्काराकडून जीवे मारण्याची धमकी
  देवळाली प्रवरा/प्रतिनिधी :
      श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकार भरत थोरात यांना दि. ८ रोजी वाळू तस्कराकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अदखलपाञ गुन्हा दाखल केला असून पञकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्याच्या  वतीने करण्यात आली .पञकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामिण पञकार संघ महाराष्ट्र राज्य  प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र उंडे  यांनी दिला आहे. 
                     श्रीरामपूर  तालुक्यातील उक्कलगाव येथील वाळूतस्कर गणपत सखाहरी पवार  याने  वृत्तपञात प्रसिद्ध झालेल्या  वाळूच्या उपशा विरोधातील वृत्तांकनाचा राग मनात धरुन गणपत पवार या वाळू तस्कराने आमच्या विरोधात बातम्या छापतो का? तुझे हात पाय तोडावे लागतील असे बोलून खुनाची धमकी दिली असतानाही श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पञकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्या ऐवजी अदखलपाञ गुन्हा दाखल करुन वाळू तस्करांला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. 
                  पञकार  भारत थोरात  यांच्या फिर्यादीवरुन  वाळूतस्कर  गणपत सखाहरी पवार  याच्या विरोधात पञकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा ग्रामिण पञकार संघ महाराष्ट्र राज्य तीव्र  आंदोलन छेडणार आहे . असा इशारा ग्रामिण पञकार संघ महाराष्ट्र राज्य  प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी दिला आहे.तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी   जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.यावेळी ग्रामिण पञकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक  अध्यक्ष दताञय खेमनर,छायचिञकार संघाचे  प्रदेश अध्यक्ष  कीरण शेलार, इलेक्ट्रिक मिडीयाचे प्रदेश अध्यक्ष जयेश सावंत, प्रदेश उपाध्यक्ष संतोष बोरुडे, सतिष टेमक, चेतन शिंदे,  दिलिप लोखंडे, साईनाथ बनकर, संदिप शेरमाळे, संजय आढाव, जालिंदर रोडे आदींनी केली आहे.