Breaking News

राममंदिराच्या भूमीपूजनानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया !

MLA Pradeep Yadav Wrote Rahul To Contribute In Ram Mandir ...
नवी दिल्ली :  अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. या भूमिपूजन सोहळ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी एक ट्विट करत प्रभू  श्रीरामचंद्रांच्या अनेक गुणांचं वर्णन त्यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, “मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचं स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे. राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही. राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही. राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.