Breaking News

पारनेर तालुक्यातील आज सकाळी प्राप्त झालेले ७ अहवाल पॉझिटिव्ह, २७ अहवाल निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यातील आज सकाळी प्राप्त झालेले ७ अहवाल पॉझिटिव्ह, २७ अहवाल निगेटिव्ह !
-------------
जवळा कान्हूर पठार कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे !


पारनेर प्रतिनिधी - 
      पारनेर तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालात ७ अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत तर २७ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
    आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये तालुक्यातील सुपा ३ सिद्धेश्वर वाडी २ जवळा १ कान्हूर पठार १ या गावाचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
     तर तालुक्यातील २६ अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाले आहे त्यामध्ये पारनेर १२ सुपा ४ कान्हूर पठार ४ कळस २ भांडगाव १ किंन्ही १ जवळा १ गुणोरे १ या गावांचा निगिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तालुक्यातील जवळा व कान्हूर पठार येथे कोरोना बधितांची संख्या वाढली आहे तर आज प्राप्त झालेल्या अहवालात पारनेर शहरातील १२ अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे पारनेरकरना दिलासा मिळाला आहे.