Breaking News

ब्राम्हणवडा येथील मंतीमंद मुलीवर अत्याचार प्रकरण, खऱ्या आरोपीला गजाआड करा जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन !

ब्राम्हणवडा येथील मंतीमंद मुलीवर अत्याचार प्रकरण
---------
खऱ्या आरोपीला गजाआड करा, पीडित मुलीची नार्को व ब्रेन मॅपिंग चाचणी करा !
-----------
आरोपीचे वडिलांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन


अकोले प्रतिनिधी :
      तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे घडलेल्या मतिमंद तरुणीवरील कथीत बलत्कार प्रकरणात अकोले पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केलेला माझा मुलगा अजित हा पूर्णपणे निर्दोष आहे. मात्र या प्रकरणात खऱ्या आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न फिर्यादी महिलेकडून केला जात आहे. त्यामुळेच या घटनेतील खऱ्या आरोपीचा शोध घेण्यासंदर्भात पिडीत तरुणीचे रक्ताचे नमुने घेण्यात यावेत व तिच्या मृत अर्भकाचे रक्त, केस, नखे, अंगातील हाडे यांची व माझा मुलगा अजित या सर्वाचीच डिएनए व आरएनए शारत्रीय तौलनिक चाचणी करण्यात यावी. तसेच पिडीतेची आई व संशयीत आरोपीयाची नार्को व ब्रेनमॅपिंग टेस्ट करून डिएनए व आरएनए शारत्रीय तौलनिक चाचणी करण्यात यावी अटक करण्यात आलेल्या निरपराध, निर्दोष व्यक्तीची सुटका करून खऱ्या आरोपीस गजाआड करावे, अशी मागणी गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वडील रंगनाथ बजाबा फलके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून केली आहे. याची माहिती त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली

श्री रंगनाथ फलके यांनी म्हटले आहे की अकोले पोलिस ठाण्याचे निरीक्षक आरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली गु. र. नं. ४९३/२०२० या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. या तपासात खऱ्या आरोपीस गजाआड करण्याबाबत आपण वारंवार विनंती करून देखील स्थानिक पोलीसांकडून सोईस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळेच आपण मंगळवारी (25 ऑगस्ट) जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना समक्ष भेटून आपली कैफियत व तक्रारी अर्ज दाखल केला


या घटनेतील खऱ्या आरोपीस अटक करण्याबाबत अकोले पोलीसांकडून सहकार्य लाभत नसल्याचा आरोप करून या गुन्ह्यातील गुन्हेगार आजही ब्राह्मणवाड्यात उजळमाध्याने खुलेआम फिरत आहेत व निष्पाप जीव अटक करुन गजाआड झाला आहे.

, श्री फलके यांनी म्हटले आहे की मी ब्राम्हणवाडा गावातील मुळवेहरा शिवारातील कायम रहीवासी आहे. येथे माझ्या मालकिची शेत जमिन आहे. तेथे मी, पत्नी सुनंदा, मुलगा अजित, सुन गिता, नातवंडे उदय (बय ७) व ओवी (वय २) यांच्यासह राहतो आणी शेती व दूध व्यवसाय करतो. माझ्या शेतापासून १ ते दिड किलोमीटर अंतरावर पीडित तरुनी व तीची विधवा आई  राहते त्यांचे वस्तीजवळच देवराम गणपत चव्हाण, दिगंबर नियृत्ती आरोटे, मारूती तुकाराम फलके, हिराबाई मारूती फलके हे कुटुंबासाह वस्तीवर राहतात. तसेच अनेक शेतकन्यांच्या शेतजमिनी जवळपासच्या अंतरात आहेत. दोन वर्षापासून आमचे व पीडित कुटुंब या यांचे आपसांत शेतीचे वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद आहेत व त्यामुळे आंम्ही एकमेकाच्या कुटुंबातील माणसे बोलत नाहीत. मात्र दोनतीन वर्षापासून चैतन्यपूर येथील एकाला त्यांनी आपली शेतीवाट्याने  दिली आहे तो वाटेकरी नेहमी त्यांच्या घरात  मुककमी थांबतो त्या व्यक्तीचा या  गुन्ह्यात तपास करण्याची गरज असताना  पोलीस या कडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहेत. 

  या गुन्ह्यात १७ ऑगस्टटला पोलीसांनी माझा मुलगा अजित यांस गुन्हा क्रमांक ४९३/२०२० च्या संदर्भात आरोपी म्हणून अटक केली आहे. 
 
वास्तविक अजित विवाहित असून त्यास पत्नी व दोन अपत्य आहेत. तो शेती व दूध व्यवसाय करतो. तो कधीही पीडितेच्या   घरी गेला नाही व त्याने हे दृष्कृत्ये केलेले नाही, हे त्याने मला विश्वासात घेऊन सांगितले आहे व माझी तशी खात्री आहे. 

  फिर्यादी महिला व बाहेर मोकाट फिरणारा संशयित आरोपी  यांचे वय ५० हून आधिक असल्याने दोघांनाही पिडीतेला मासिकपाळी येणे, बंद होणे, दिवस जाणे, त्यामुळे स्त्रीच्या शरीरात बदल होणे व ते नजरेस दिसणे यांचे ज्ञान आहे. पीडित हिस ७ महिन्यापूर्वीच दिवस गेलेले आहेत हि बाब समजून देखिल सदरहू प्रकार झाकून नेण्याचा प्रकार केला व तिला गावठी औषधे देवून सदरहू गर्भ पाडण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांच्या दुर्दैवाने त्याकामी त्यांना यश न आल्यामुळे व पीडित तरुणी स   त्रास होव लागल्याने भीती पोटी फिर्यादी  आई व संशयित आरोपी यांनी पीडित मुलीस   धांडे हॉस्पिटल, आळेफाटा येथे दाखल केले. परंतू तेथील डॉक्टरांनी ही बाब स्थानिक पोलीसांना कळविल्यामुळे सदरहू प्रकार उघडकीस आला. स्वतःचा बचाव करण्याकरीता फिर्यादी महिला व संशयित आरोपी याची असलेली जवळीक व फिर्यादीचे   अज्ञान व अशिक्षितपणा यांचा गैरफायदा घेवून आळेफाटा पोलीस ठाण्यात माझा मुलगा अजित याच्या विरूध्द खोटी फिर्याद दाखल केली आहे. म्हणूनच पिडीतेची आई व संशयीत आरोपी  याची नार्को व ब्रेनमॅपिंग टेस्ट करून संशयित आरोपी याचीही डिएनए व आरएनए शारत्रीय तौलनिक चाचणी करण्यात येऊन घटनेतील खऱ्या आरोपीस अटक करुन निष्पाप तरूणास न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी  अटकेतील आरोपीचे वडील रंगनाथ बजाबा फलके यांंनी पत्रकार परिषदेत केेेेली.
-