Breaking News

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुपा शहर तीन दिवस बंदचा निर्णय बदलला, सर्व व्यवहार पुन्हा सुरू !

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुपा शहर तीन दिवस बंदचा निर्णय बदलला, सर्व व्यवहार पुन्हा सुरू !


 सुपा / प्रतिनिधी :
    पारनेर तालुक्यातील सुपा शहरात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्वरित सुपा बंद करण्याचे आदेश शुक्रवारी सकाळी अकरा वाजता दिला होता मात्र हा निर्णय बदलण्यात आला असून सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले आहे.तीन दिवसांसाठी सुपा शहर बंदचा निर्णय तहसीलदार यांनी मागे का घेतला यासाठी सुपा प्रतिनिधी यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
      सुपा शहरात नागरिकांकडून सोशल डिस्टन चे पालन होत नाही तसेच शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमावलीचे पालन नागरिक करत नाहीत म्हणून तीन दिवसांसाठी सुपा शहर हे पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय तहसीलदार ज्योती देवरे यांनी घेतला होता.
    सुपा येथे शुक्रवारी प्राप्त झालेले  चारही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तसेच पंधरा अहवाल लॅबमध्ये प्रलंबित आहेत व आरोग्य विभागामार्फत अजूनही संपर्कात आलेल्या रुग्णांचा शोध सुरू आहे. यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे म्हणून सुपा तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
     तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपा शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले असल्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.त्यातच बाहेर गावाहून खरेदीसाठी येणाऱ्या नागरीकांकडून सोशल डिस्टनचा फज्जा उडवला जात आहे.
     दरम्यान बंदचा निर्णय मागे घेतला असला तरी ग्रामस्थ व नागरीकांना सर्दी, खोकला, ताप,शिंक येणे,छातीत दुखणे,घसा जाम होणे आदी लक्षणे दिसत असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.
   फोटो ओळी- सुपा ता.पारनेर येथे शुक्रवारी अकरा वाजता बंदचा निर्णय देताना तहसीलदार ज्योती देवरे.