Breaking News

कोपरगावातील अतिक्रमित घरे नियमाकुल करण्याची कार्यवाही तातडीने राबवा- सौ स्नेहलता कोल्हे

कोपरगावातील अतिक्रमित घरे   नियमाकुल करण्याची कार्यवाही तातडीने राबवा- सौ स्नेहलता  कोल्हे
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येकाला घर या योजनेचा लाभ कोपरगाववासियांना मिळाला पाहिजे, म्हणून जुलै 2019 मध्ये बैठक घेऊन शहरातील अतिक्रमणे नियमाकुल करण्याचे अधिका-यांच्या बैठकीत ठरले होते, परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नसल्याने त्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करून शहरातील अतिक्रमित घरे लवकरात लवकर नियमाकूल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता  बिपीनदादा कोल्हे यांनी केली आहे.
प्रधानमंत्री आवास येजनेअंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येकाला घर या योजनेचा लाभ कोपरगाव वासीयांना मिळाला पाहिजे म्हणून सौ कोल्हे यांनी जुलै 2019 मध्ये प्रांताधिकारी, तहसिलदार, भुमिअभिलेख विभागाचे अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या समवेत बैठक नागरीकांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील हनुमाननगर, इंदिरानगर, दत्तनगर, महादेवनगर, गोरोबानगर, गजानननगर, लिंबारा मौदान, गांधीनगर,टिळकनगर, संजयनगर, सुभाषनगर, लक्ष्मीनगर, साईनगर, येवलारोड, खडकी, जिजामाता उद्यान,दत्तपार, टाकळीनाक्यामागील व बेट अशा वीस ठिकाणी 5 हजार 561 अतिक्रमीत घरे असून येथील रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न असल्याचे सौ कोल्हे यांनी सांगितले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2011 पर्यंतची अतिक्रमीत रहिवाशांना दिलासा देण्यासाठी सुधारित शासन निर्णयही काढून अशी घरे नियमानुकुल करण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यासंदर्भात शासकीय जागेवर अतिक्रमण करून रहिवास करणा-यांचे लवकरात लवकर सव्हेक्षण करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला होता, यावेळी प्रायोगिक तत्वावर लक्ष्मीनगर येथील अतिक्रमित घरे नियमाकुल करण्याचा प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी,अहमदनगर यांचेकडे पाठविण्यात आला. त्यानंतर मा.जिल्हाधिकारी यांचेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर  सदरचा प्रस्ताव अहमदनगर जिल्हाधिकारी यांचेमार्फत संचालक, नगररचना व मुल्यनिर्धारण विभाग पुणे यांचे कार्यालयाकडे असून यावर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. परंतु सदरची प्रक्रिया प्रलंबित आहे, त्यामुळे या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही होऊन कोपरगाव  शहरवासीयांची अतिक्रमीत घरे नियमाकुल करण्याची मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे