Breaking News

गांजीभोयरे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, १६ जणांन विरोधात गुन्हा दाखल !

पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे दोन गटात रस्त्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी !
पारनेर प्रतिनिधी - 
      पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे रस्त्यावर काट्याचा फास टाकून रस्ता अडवला या कारणाने दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली यामध्ये दोन्ही गटांनी एकमेका विरोधात गुन्हे दाखल केले आहेत एकूण १६ जणांवर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किसन गंगाराम पांढरे राहणार गांजीभोयरे तालुका पारनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब सखाराम पांढरे गंगाराम तुकाराम पांढरे तुषार मोहन पांढरे अतुल मोहन पांढरे  सखाराम राजू पांढरे तुकाराम राजू पांढरे मोहन पाटीलबा पांढरे सावित्राबाई सखाराम पांढरे सरुबाई तुकाराम पांढरे राहणार गांजीभोयरे तालुका पारनेर यांनी फिर्यादी हे दूध घालण्यासाठी गावांमध्ये जात असताना रस्त्यावर वरील आरोपी यांनी काट्याचा फास टाकला होता त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी  यांना त्याबाबत विचारणा केली असता आरोपी यांना राग येऊन त्यांनी फिर्यादीस हातातील लाकडी काठी व हातात दगड घेऊन मारहाण केली फिर्यादी यांना सोडविण्यास आलेला फिर्यादीचा भाऊ संतोष गंगाराम पांढरे, रूपाली किसन पांढरे, जया संतोष पांढरे, सावित्रा गंगाराम पांढरे यांनाही वरील आरोपी  यांनी हाताने मारहाण केली व वाईट  शिवीगाळ केली तसेच परत या रस्त्याने आले तर तुमचा  मुडदा पाडू  अशी धमकी दिली आहे. भांडणांमध्ये फिर्यादी यांची भावजय जया हिचे गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले आहे.
दुसर्‍या गटाची फिर्याद भाऊसाहेब सखाराम पांढरेे राहणार गांजीभोयरे तालुका पारनेर यांनी दिली आहे यात आरोपी किसन गंगाराम पांढरे संतोष गंगाराम पांढरे राहुल किसन पांढरे सावित्राबाई गंगाराम पांढरे रूपाली किसन पांढरे  जया संतोष पांढरे संजय किसन पांढरे राहणार गांजीभोयरे तालुका पारनेर यांनी फिर्यादी  त्यांचे शेत गट नंबर २४५ मध्ये काट्याचा फास टाकला होता. त्यावेळी वरील आरोपीं  फिर्यादीस म्हणाले की  रस्त्यावर काट्या का टाकल्या  आमचा येथून रस्ता आहे त्यावेळी फिर्यादी त्यांना समजावून सांगत होते  हा रस्ता नसून  हे आमचे शेत आहे  याचा आरोपी ना राग घेऊन  त्यांनी भाऊसाहेब सखाराम पांढरे याना हातात दगड धरून  मारहाण केली  व भांडणे सोडवण्यासाठी आलेला  फिर्यादीचा  चुलत भाऊ गंगाराम पांढरे  यास  संतोष याने डाव्या हाताचे कोपरा जवळ  तोंडाने चावा घेतला तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेली फिर्यादीची आई सावित्राबाई  व चुलती  सरसाबाई  यांनाही वरील आरोपी  यांनी  हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली  यावरून दोन्ही गटात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉन्स्टेबल एस ही लोणारे  पोलिस नाईक एस व्ही गुजर हे करत आहेत.