Breaking News

बाजार समितीमार्फत मुगाचे हमीभाव केंद्र त्वरित सुरू करावे पारनेर भाजपची मागणी !

बाजार समितीमार्फत मुगाचे हमीभाव केंद्र त्वरित सुरू करावे पारनेर भाजपची मागणी
-----------
शासकीय हमीभाव प्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांचा मूग खरेदी करा
मुग उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
-----------


पारनेर प्रतिनिधी-
    पारनेर तालुक्यांमध्ये मुग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसामुळे मूग काळे पडल्याने दलाल व व्यापारी कवडीमोल दरात ते खरेदी करत आहेत त्यासाठी बाजार समितीमार्फत हमीभाव केंद्र सुरू करावे अशी मागणी भाजप तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब चेडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पारनेर तालुक्यातील मग पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. परंतु मग काढणीच्या वेळेस संततधार पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.  तालुक्यात मुग विक्री साठी कोणतीही बाजारपेठ नाही त्यामुळे खाजगी दलाल व व्यापारी पावसामुळे मूग काळे पडले आहे हे कारण पुढे करून अत्यल्प दरामध्ये मुग खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे त्यामुळे शासनाने दिलेल्या हमीभावा प्रमाणे मूग खरेदी करण्यासाठी बाजार समितीमार्फत हमीभाव केंद्र त्वरित सुरू करावे व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा भारतीय जनता पक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मागणी केली आहे.
पारनेर तालुक्यातील मूग नाफेड मार्फत बाजार समितीने हमीभाव प्रमाणे खरेदी करून तालुक्यातील बळीराजाला दिलासा द्यावा अश्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब चेडे आणि पारनेर तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष रमेश साबळे यांनी बाजार समितीला दिले हमीभाव केंद्र त्वरित सुरू न झाल्यास बाजार समिती समोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी हे निवेदन बाजार समितीचे सचिव यांच्याकडे देण्यात आले आहे.