Breaking News

राम मंदिरासाठी एच यु गुगळे यांच्या कडुन चांदीची विट !

राम मंदिरासाठी एच यु गुगळे यांच्या कडुन चांदीची विट !

जामखेड प्रतिनिधी :
   ऐतिहासिक नगरी आयोध्या येथे उभारल्या  जात असलेल्या श्री राम मंदिरासाठी जामखेडचे एच यु गुगळे यांच्याकडून एक किलो वजनाची चांदीची विट भेट दिली आहे. 
     सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांच्या हस्ते विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विवेक कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली. एच यु गुगळे यांची चांदीची विट राम मंदिर समितीच्या विश्वस्तांकडे पोहोच केली जाणार असल्याचे विवेक कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी प्रमुख उपस्थितीत रमेश गुगळे, दिलीप गुगळे, शंभुसुर्या आखाडय़ाचे अध्यक्ष संतोष टेकाळे, विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष दिगांबर राळेभात, एच यु गुगळे पतसंस्थेचे व्यवस्थापक वैभव कूलकर्णी, ब्रह्मदेव भिडे, प्रशांत कुलकर्णी, सारिका संजय इंगळे, दिग्विजय देशपांडे, जूबेरखान पठाण, उपस्थितीत होते. 
   दि ५ आँगस्ट  रोजी ऐतिहासिक नगरी आयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मर्यादा पुरूष श्री राम मंदिराचे भुमिपूजन मोठ्या हर्ष उल्हास पार पडले आहे. या दिवसापासून देशात बंधुभाव जातीय सलोखा सौहार्द वाढीस लागेल असा विश्वास रमेश गुगळे यांनी व्यक्त केली.