Breaking News

पठार भागावर पाणी आणण्यासाठी पुर्ण ताकत लावणार-सचिन ठुबे

पठार भागावर पाणी आणण्यासाठी पुर्ण ताकत लावणार-सचिन ठुबे


टाकळी ढोकेश्वर :
   पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गावातील समाजाची तळमळ असणारे युवा कार्यकर्ते सचिन दशरथ ठुबे यांची  भाजपा तालुका उपाध्यक्ष पदी  निवड झाली.  ठुबे यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ अनेक वर्षापासून पक्ष वाढीसाठी  एकनिष्ठपणे काम करणारे सचिन ठुबे यांची पारनेर तालुका भाजपा उपाध्यक्षपदी निवड जाहीर होताच तरुणांमध्ये मध्ये नवचैतन्य निर्माण झाले सचिन ठुबे यांनी राजकीय जीवनात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत भाजपा संघटक म्हणून व पत्नी महिला तालुकाध्यक्ष आदि पदावर काम करताना त्यांनी आपली जबाबदारी अतिशय प्रभावी पणे पार पाडली गावातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले आहे. 
   निवडी नंतर सचिन ठुबे  यांनी सांगितले की,आपण भाजपाची ध्येय धोरणे सोशल मिडियाच्या माध्यमातून समाज्यापर्यंत पोहचवण्यासाठी काम करत राहणार आहे. आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये सोशल मिडियाचे कार्य मोठे असून आपले मत व्यक्त करण्याचे सोशल मिडिया महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे.  युवकांमध्ये सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.सोशल मिडियाचा आपण सकारात्मक वापर केला पाहिजे. त्याचबरोबर आपण समाजातील तळागाळामध्ये पोहोचून समाजातील वेगवेगळ्या अडीअडचणी सोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार आहे. 
   पठार भागाच्या जनतेसाठी  येणाऱ्या काळात मोठे आंदोलने उभे करणार.  पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडवणीस, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील,  कुकडीचे मुख्य अभियंता राजपूत साहेब,  अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ साहेब,  कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे,  यांच्या मार्फत अळकुटी,  वडझिरे, कान्हूर पठार,  टाकळी ढोकेश्वर, भाळवणी,  ढवळपुरी या मोठ्या भागात जनतेच्या सहकार्याने कुकडीचे पाणी मिळवण्यासाठी  फार मोठा लढा देणार आहे.  खासदार सुजय विखे, वसंतराव चेडे, मा. मंत्री  राम शिंदे साहेब, भानुदास बेरड सर, मोनिकाताई राजळे, शिवाजी कर्डिले,  आमदार बबन पाचपुते,  सुभाष दुधाडे यांच्या नेतृत्वाखाली पठार भागाचा ध्येय धोरण समोर ठेवून पुन्हा एकदा भाजपाची मशाल हातात घेऊन राजकारणात सक्रिय झालो आहे.