Breaking News

टाळेबंदीतही दुचाकींच्या विक्रीत वाढ.!

  Offerings from two-wheeler companies to increase sales during the ...

 संपूर्ण देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. देशातील मोठमोठ्या विविध क्षेत्रातील उद्योग समूहांना कोरोनाचा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटापासून ऑटोमोबाईल क्षेत्राला त्याची चांगलीच झळ बसली आहे. पण स्कुटर दुचाकीच्या विक्रीमध्ये काहीशी वाढ दिसून आली.

जुलै महिन्यात दुचाकींची विक्री वाढली. Autopunditz च्या अहवालानुसार, जुलै महिन्यात होंडा अ‌ॅक्टिवाच्या १,१८,८५९ गाड्यांची विक्री झाली. विक्रीच्या बाबतीत तसेच ही गाडी ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. जुलैमध्ये टीव्हीएस ज्युपिटरच्या ४८,९९५ गाड्यांची विक्री झाली.

जुलैमध्ये होंडा डिओच्या ३७,२३३ गाड्यांची विक्री झाली. जुलैमध्ये सुझुकी अ‌ॅक्सेसच्या २३,१७१ गाड्यांची विक्री झाली. TVS Ntorq च्या १६,४०४ गाड्यांची विक्री झाली.

प्लेजरच्या १६,२९० गाड्यांची विक्री झाली. हिरोईन डेस्टिनी १२५ च्या १३,१८४ गाड्यांची विक्री झाली. यामाहा रेच्या १२,०३२ गाड्यांची विक्री झाली तसेच यामाहा फेसिनोच्या ११,५८४ गाड्यांची विक्री झाली. टीव्हीएस पेप प्लसच्या १०,२१० गाड्यांची विक्री झाली.