Breaking News

कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी शेततळी, साठवण तलाव, पाझर तलाव भरून घेणेकरिता वापरावे : - आ. बबनराव पाचपुते

कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी विसापूर मध्ये ओव्हरप्लो पाण्याचा अधिकारी वर्गांनी  शेततळी, साठवण तलाव, पाझर तलाव भरून घेणेकरिता वापर करावा : - आमदार बबनराव पाचपुते
असे मिळेल साकळाई योजनेला पाणी! : माजी ...
श्रीगोंदे तालुका प्रतिनिधी-
 सद्या मोठया प्रमाणात सर्वत्र  पाऊस  पडत असल्याने कुकडी प्रकल्पात  ही पाण्याची चांगली आवक होत असल्याने अधिका-यांनी कुकडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या   ओव्हरप्लो  पाण्याचा  लाभक्षेत्रातील शेततळी, साठवण तलाव, पाझर तलाव, व इतर तलावामध्ये पाणी साठवून ठेवावे व या चालू असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून  ओव्हरप्लो च्या पाण्याचा चांगला पद्धतीने वापर करावा असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव  पाचपुते यांनी करून ते पुढे म्हणाले की, कुकडीच्या प्रकल्पात चांगला पाऊस झाला असल्यामुळे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सद्या विसापूर तलावात सोडले असुन शेतकऱ्यांनी शेततळी भरुन घ्यावीत या पाण्याचा भविष्यात उपयोग होणार असल्याचे आ.बबनराव पाचपुते यांनी सांगितले
सध्या कुकडीच्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने काही धरणे100 टक्के भरली आहेत तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत म्हणुन कुकडीच्या अधिका-यांनी ओव्हर फ्लोचे पाणी विसापूर तलावात सोडले आहे या पाण्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे शेतकर्यांनी या पाण्यातुन आपले शेततलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, भरून घ्यावेत असेही आवाहन आ.पाचपुते यांनी केले आहे.

जलसंपदा विभागाचे आभार.!
ओव्हर फ्लो मधुन विसापूर तलावात पाणी सोडण्यात आल्याने  जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील, कुकडीचे मुख्य अभियंता राजपूत, अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ कुकडीचे कार्यकारी  अभियंता स्वप्नील काळे  आदींचा आभारी आहे या पाण्याचा नक्कीच श्रीगोंद्याला फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया आ.बबनराव पाचपुते यांनी दिली