Breaking News

लोणी मावळा येथील भैरवनाथ पतसंस्थेमध्ये चोरी करण्याचा डाव फसला !

लोणी मावळा येथील भैरवनाथ पतसंस्थेमध्ये चोरी करण्याचा डाव फसला
निघोज प्रतिनिधी :
   पारनेर तालुक्यातील लोणी मावळा या गावामध्ये काल रात्री भैरवनाथ सहकारी पतसंस्थेमध्ये अज्ञात चोरांनी भिंत तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला.
   चोरांनी मागील बाजुची भिंत तोडुन आतमध्ये प्रवेश केला आणि गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला परंतु गॅस संपल्याने अज्ञात  चोरांचा डाव फसला व चोरी करण्यात ते अयशस्वी झाले. सदर घटनेची माहीती भैरवनाथ पतसंस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ वरखडे यांनी पारनेर पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर घटनेच्या ठिकाणी पीएसआय बालाजी पद्मने घटनेस्थळी जाऊन पाहणी केली. असता तिजोरीतील रक्कम व्यवस्थित असुन आणखी काय चोरीस गेले याचा शोध चालु आहे.