पठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल ! --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...
पठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल !
---------------
पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकीमुळे केली आत्महत्या
पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील आत्महत्या केलेल्या किरण उर्फ अक्षय लहू पवार वय २१ वर्ष रा. पठारवाडी ता. पारनेर जि. अहमदनगर याने जीवे मारण्याची धमकी व दमदाटी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी दाखल केली आहे. त्यावरून सचिन किसन वराळ विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत मुलाच्या वडिलांनी लहू शिवराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा (मयत) किरण उर्फ अक्षय लहू पवार हा याचे मोबाइल नंबर वरील येणारे सर्व फोन हे अचानक निघोज येथील तरुणीच्या फोनवर जात असल्याने आरोपी सचिन किसन वराळ व इतर अनोळखी हे किरण(मयत) यास फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देऊन शिवीगाळ दमदाटी करत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून किरण उर्फ अक्षय लहू पवार याने संकेत सुपेकर याच्या पोल्ट्री फार्म मधील शेडचे लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशन मध्ये भा. द. वी. क. ३०६, ५०४, ५०६, ३४, सह अ. जा. ज. अत्याचार प्रतिबंध सुधारणा अधिनियम सन २०१५ चे कलम ३(१)(r)(s) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे करत आहेत.
दरम्यान या तरुणाच्या आत्महत्या नंतर त्याठिकाणी तरुणांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यानुसारच मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चिठ्ठीच्या आधारे पोलीस पुढील तपास करणार आहेत. इतर आरोपींचा शोध घेतला जाणार आहे त्यामुळे ही आत्महत्या प्रेमसंबंधातून दमदाटी व मारहाण केल्यामुळे झाली असल्याची चर्चा आहे.