Breaking News

फिरस्त मेंढपाळ बांधवाना संरक्षण द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार-अशोक डोमाळे !

फिरस्त मेंढपाळ बांधवाना संरक्षण द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार-अशोक डोमाळे !
देवळाली प्रवरा प्रतिनिधी 
                      मेंढपाळ बांधव गावोगाव फिरस्त करुन मेंढ्या चारण्यासाठी जातात.परंतू  गावगुंड, समाजकंटक  आणी हीस्त्र प्राणी यांचे हल्ल्यात सातत्याने वाढ होत आहे. मेंढपाळ कोणत्या एका जाती धर्माचा नसल्याने  त्यांच्या मागणीवर  राजकारण नकरता. त्यांना संरक्षण द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा यशवंत सेनेचे अशोक डोमाळे यांनी दिला आहे. 
                          मेंढपाळ एका जाती धर्मातील नसून मेंढ्या घेवून राज्यभर चारण्यासाठी फिरत असतात.  कोरोना सारख्या  महामरीच्या परीस्थितीत बहूतांशी  गावात मेंढपाळांवर हल्ले होत आहे. त्यामध्ये  कमालीची वाढ झाली आहे . आजच्या परीस्थितीला  एका दिवसात साधारण तीन ते चार हल्ले होत आहे.  मेंढपाळांची  तक्रार दाखल करुन घेतली जात नाही. त्याची दखल देखील प्रशासन घेत नाही. प्रशासन किती दिवस  निष्क्रिय  राहणार आहे. ?  मेंढपाळाच्या कुटुंबावर  होणारा  अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी राज्यात एकाच दिवशी  6 ऑगस्ट  रोजी  यशवंत सेनेच्या वतीने तहसीलदार, जिल्हाधिकारी, आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार आहे, 
              मेंढपाळ बांधवांनी व मेंढपाळ संघटनांनी  सहभागी होऊन निवेदन द्यावीत. मेंढपाळ बांधवा साठी राज्यव्यापी  आंदोलन यशस्वी करुन प्रशासनाला मेंढपाळांबाबत  योग्य  निर्णय घेण्यास भाग पाडण्यात येईल.असे डोमाळे यांनी सांगितले.