Breaking News

पारनेर शहरातील सोसायटीचे चेअरमन, स्वस्त धान्य दुकानदारांवर गुन्हा !

पारनेर शहरातील सोसायटी चे चेअरमन,स्वस्त धान्य दुकानदारांवर गुन्हा
--------
गरजूंना धान्य न देता स्वत:च्या फायद्यासाठी धान्य विकल्याचा आरोप
------
अपहार करुन शासन व लाभार्थ्यांची  केली फसवणूक
पारनेर प्रतिनिधी -
   पारनेर शहरातील दोन्ही विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन,स्वस्त धान्य दुकानदारांवर साठ्यामध्ये तफावत आढळून येत असल्यामुळे लाभार्थ्यांना धान्य न देता स्वतःच्या फायद्या साठी इतरत् विकून त्याचा अपहार केला म्हणून दोन्ही सोसायटीच्या चेअरमन धान्य दुकानदारांवर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पारनेर शहरातील पारनेर (पश्चिम भाग) विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड व पारनेर(म.प) पूर्वभाग विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.पारनेर ता पारनेर जि अहमदनगर यांचे अखत्यारीत असलेले स्वस्त धान्य दुकानांना मंजूर करण्यात आलेला दि 28 रोजी पावेतो साठा तपासला असता त्यामध्ये तफावत आढळून आलेली असून स्वस्त धान्य दुकानांचे परवानाधारक आरोपी  पारनेर पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि चे चेअरमन दुकान चालक नारायण नामदेव म्हस्के रा.पारनेर व पारनेर (म.प) पूर्वभाग विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि पारनेर चे चेअरमन दुकान चालक शकूर यासीन शेख रा पारनेर जि अहमदनगर यांनी स्वतःच्या फायद्याकरता दुकानांना मंजूर केलेल्या धान्यसाठा गरजू लाभार्थ्यांना न देता तो स्वतःच्या फायद्याकरता कोठेतरी विक्री करून अपहार करुन शासन व लाभार्थ्यांची फसवणूक केली आहे. याबाबत फिर्याद विवेक विनोद वैराळकर वय-38 धंदा नोकरी रा-पारनेर वेशी जवळ ता पारनेर जि अहमदनगर त्यांनी दिली आहे त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.