Breaking News

पारनेर तालुक्यात शेतकऱ्याच्या मुगाची झाली माती !

पारनेर तालुक्यात शेतकऱ्याच्या मुगाची झाली माती
--------------
शेतकऱ्याच्या शेतीत पिकवल्या मुगाची दुरावस्था


शशिकांत भालेकर/पारनेर :
तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी मूगाचे विक्रमी उत्पादन घेतले होते सुरुवातीला पाऊस झाल्यामुळे मुगाचे उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला मुगाला अनुकूल वातावरण असल्याने मूग जोमात आले मात्र गेल्या आठवडाभर संततधार चाललेल्या पावसामुळे तोडणीस आलेल्या मुगाला मोड आले तर काही मुगाच्या शेंगा ला बुरशी लागून ते काळे पडले आहेत ते तयार केलेले मूग व्यापारी ही घेत नाहीत.
   तालुक्यांमध्ये पावसाळा सुरुवात झाल्यानंतर मृग नक्षत्रामध्ये वटाणा व मूग हे पिके प्रामुख्याने घेतली जातात यावर्षी वेळेत पाऊस झाल्यामुळे मुगाचे उत्पादन घेण्यात आले व हवामान सुरवातीच्या काळात चांगले असल्याने मुगाला तवर व शेंगा चांगल्या झोंबल्या त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याला विक्रमी मुगाचे उत्पादन मिळणार असे वाटत होते मात्र झाले भलतेच नेमका मुगाच्या शेंगा काढणीला आलेल्या आणि तालुक्यात व राज्यभर संततधार पाऊसा सुरुवात झाली पाऊस उघडेल या आशेवर शेतकरी बसला मात्र पाउस काही थांबायचे नाव घेत नव्हता ढगाळ वातावरणामुळे व संततधार पावसामुळे या मुगाच्या शेंगा ला कोंब फुटले तर शेंगा च्या आत बुरशी तयार होऊन दाणे काळे पडले अशातही शेतकऱ्यांनी मुगाच्या शेंगा तोडणीस सुरुवात केली वरती पाऊस पडत असतानाही शेतकरी मुगाच्या शेंगा तोडणी ला लागला त्यासाठी मजूर शेतकऱ्याला मिळेनासे झाले जास्तीची मजुरी देऊन इतर गावातून मजूर बोलून काही शेतकऱ्यांनी तोडणी केली तोडलेला मूग एकत्रित घरामध्ये साठवून ठेवला ऊन नसल्याने त्या शेंगांना ही बुरशी लागून तो काळा पडला त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली ही मेहनत वाया गेली व मेहनतीबरोबरच मजूरांना शेतकर्‍यांनी घातलेले पैसे तयार केलेल्या मुगातून निघणार नाही यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे निसर्गाने केलेल्या या अन्यायामुळे आर्थिक दृष्ट्या शेतकरी पूर्ण कोलमडून गेला आहे शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून त्यासाठी त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी या आशेवर शेतकरी सध्या आहे मात्र शासन आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कसा आधार देते यावरच शेतकर्‍याचा पुढील आर्थिक गाडा अवलंबून आहे.

   जर वेळेत पावसाने उघडीप दिली असती तर शेतकऱ्याला माती समान मुग झाले असते मात्र पावसामुळे त्याच मुगाची माती झाली असे म्हणावे लागेल या तयार केलेल्या मुगाचे आता करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे हे मुग धड जनावरेही खात नाहीत तर ते बाजारात कोण घेणार अशा गहन संकटात शेतकरी सापडला आहे.
-------------
     यावर्षी मुगाला १००० रु ते ६५०० रु प्रति क्विंटल बाजार भाव मिळत आहे पावसामुळे मुगाची माती झाली मुग काळे पडले आहेत त्यांना कवडीमोल बाजार मिळत आहे मजुरांना घातलेले पैसे वसूल होत नाही अशा दुरास्थेत शेतकरी आहेत.