Breaking News

१५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन ग्रामसभा घ्यावी !

१५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन ग्रामसभा घ्यावी !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
   दर वर्षी १५ ऑगस्ट रोजी गावातील समस्या जाणून घेण्यासाठी ग्राम सभेचे आयोजन केले जात असते सदर ग्राम सभेत गावातील नागरिक विविध समस्या मांडत असतात. त्याच प्रमाणे या ग्रामसभेत गावातील विकास कामे विविध योजनेतील लाभार्थींची यादी वाचन केले जाते मात्र या वर्षी देशभर करोना साथीच्या आजाराने लॉक डाऊन जाहीर करण्यात आले तसेच सर्व शासकीय व गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच जमाव बंदीचा आदेश जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे या ग्राम सभा होणार नाहीत मात्र या कालावधीत अनेक ग्रामपंचायत कालावधी संपलेला असून लवकर अशा ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर करण्यात आल्या असत्या मात्र करोना साथीच्या आजाराने निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या असून सरकार अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा विचार करत आहे. मात्र अशात १५ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा न झाल्यास ग्रामीण भागातील अनेक विकास कामाना मंजुरी मिळणार नाही त्या कामाबाबत साधक बाधक चर्चा होणार नाही. मात्र आता सर्वच ग्रामपंचायती डिजिटल झालेल्या असून ग्राम सभा ऑनलाईन घेण्यात याव्यात असा शासन निर्णय झालेला आहे मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी करोना साथीचे कारण सांगून ग्रामसभा घेण्याचे टाळाटाळ करण्याची शक्यता आहे मात्र प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये १५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन ग्राम सभा घेण्यात यावी व तसे सक्त आदेश ग्रामपंचायती ना द्यावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे