Breaking News

हनुमान मंदिराचे भूमिपूजन संपन्न !

हनुमान मंदिराचे भूमिपूजन संपन्न !
करंजी प्रतिनिधी-
 आज गुरुवार दि ५ ऑगस्ट रोजी ठीक सकाळी १० वाजता करंजी येथील हनुमान मंदिराचे भूमिपूजन ह भ प सोपान काका करंजीकर यांच्या शुभहस्ते कुदळ टाकून करण्यात आले.
  आज च्या शुभ मुहूर्तावर करंजी येथे नव्याने बांधण्यात येणारे श्री हनुमंताचे मंदिर भूमिपूजन आज विधिवत पूजा करत ह भ प सोपानकाका करंजीकर यांच्या शुभहस्ते कुदळ टाकून सुरवात करण्यात आली.
 या वेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन, संजीवनी साखर कारखाना संचालक भास्कर भिंगारे, कर्मवीर काळे साखर कारखाना संचालक संजय आगवन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे, करंजी गावातील समस्त भजनी मंडळ व व गावकरी उपस्थित होते