Breaking News

कोळपेवाडी बाजार पेठेतील दुकाने रात्री आठ वाजे पर्यंत सुरू ठेवण्याची. साई सेवा प्रतिष्ठानची मागणी !

कोळपेवाडी बाजार पेठेतील दुकाने रात्री आठ वाजे पर्यंत सुरू ठेवण्याची. साई सेवा प्रतिष्ठानची मागणी !

कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
     कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी बाजार पेठेशी बारा गावचा जवळचा संपर्क येत असल्याने व्यापारी दुकाने रात्री आठ वाजे पर्यंत सूरु ठेवण्याची माागणी साई सेवा पतिष्ठान कडून जिल्हा अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. 
       पत्रात म्हटले आहे की कोळपेवाडी परिसरातील व्यापारी दुकानदारांनी कोरोना आपत्ती काळात शासनाचे सर्व आदेश पाळत जनसेवा अंगिकरात जनतेला किराणा माल  भाजीपाला या सह जीवणावश्यकच वस्तूंचा पुरवठा कुठलीही तक्रार न होता वेळेचे बंधन पाळून संसर्ग होऊ न देता केलेला आहे  राज्यातील कोरोना परिस्थिती पेक्ष्या भूख मारी बेरोजगारी हे प्रश्न नागरिकासमोर महत्वाचे असल्याने बाजार पेठे मध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्यास सर्व श्रम जीवी वर्गास रोजगार प्राप्त होऊन अर्थ व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे आगामी काळात भारतीय संस्कृती तील महत्वाचे सण येत असल्याने छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना  व्यवसायांची संधी उपलब्ध होणार आहे त्या साठी लॉक डाऊन च्या वेळेत शिथिलता आल्यास सर्व काही व्यवहार सुरळीत होऊन अर्थ व्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास संस्थेद्वारे जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात संस्थे चे अध्यक्ष रमेश भोंगळ उपाध्यक्ष  भाऊसाहेब वाघडकर सदस्य वाल्मिक जाधव,  राऊसाहेब मोरे,  वैशाली कोळपे ,हिराबाई साळी,भाऊसाहेब धुंदे, सोमनाथ गोरडे, आदिनी केले आहे.