Breaking News

श्री'राम' जन्मभुमी मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा ऐतिहासिक दिना'निमित्ताने' उक्कलगाव'मध्ये' वृक्षारोपण !

श्री'राम' जन्मभुमी मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा ऐतिहासिक दिना'निमित्ताने' उक्कलगाव'मध्ये' वृक्षारोपण 
 श्रीरामपूर - 
पाचशेहून अधिक वर्षाच्या प्रतिक्षेतनंतर अखेरीला श्रीराम मंदिर भूमिपूजन निर्माण कार्याचा शुभारंभ पार पडला. अखेरीस तो ऐतिहासिक क्षण बुधवारी अतिशय शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या शुभहस्ते भूमिपूजनने पार पडला आहे 
तो क्षण संपुर्ण जगाने व भारतीय जनसामान्यांने लोकांनी बुधवारी पाहीला आहे 
       ऐतिहासिक दिनानिमित्ताने शुभ कार्याने उक्कलगावमध्ये खंडोबा मंदिराच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला सोहळयाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय मराठा संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात, धनंजय थोरात, गणेश शिवाजी थोरात, ज्ञानेश्वर आबंरे, शरद थोरात,आदि युवकांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला होता. 
                खंडोबा मंदिर आवारात श्रीरामपूरचे जेष्ठ नेते व देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ पा थोरात, अशोक कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब हरी थोरात, पंचायत समितीचे माजी सभापती आबासाहेब थोरात अॅड. रविद्र हाळनोर आदी सह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला होता. 
        वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी शरद थोरात,रावसाहेब थोरात युवराज थोरात,
नंदू थोरात कैलास थोरात गोरख थोरात आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.