Breaking News

जिल्हा न्यायालयात कोरोनाची एण्ट्री, अधीक्षिकेचे कोरोनाने निधन !

जिल्हा न्यायालयात कोरोनाची एण्ट्री, अधीक्षिकेचे कोरोनाने निधन !
अहमदनगर । प्रतिनिधी :
येथील जिल्हा न्यायालयात अधिक्षिका या पदावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे  कोरोनामुळे निधन झाले.  त्या ५७ वर्षांच्या होत्या. अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगी असा परिवार आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयात त्यांची जास्तीत जास्त सेवा झाली. त्यांच्या सेवानिवृत्तीला अवघ्या तीन महिन्यांचाचा कालावधी शिल्लक होता. जिल्हा न्यायालयात महत्वाची जबाबदारी सांभाळत असलेल्या महिला अधिकाऱ्याचे कोरोनामुळे निधन झाल्याने न्यायालय परिसरात चिंता पसरली आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष विधिज्ञ भूषण बऱ्हाटे यांनी तमाम वकील बांधवांच्यावतीने जिल्हा न्यायालयाच्या या महिला अधिकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यापूर्वी ही न्यायालयीन कर्मचारी पाझिटिव्ह आढळल्याने जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.