Breaking News

कोपरगाव बंदला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद, घरोघरी आरोग्य तपासणी सुरू!

कोपरगाव बंदला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद,  घरोघरी आरोग्य तपासणी सुरू!


करंजी प्रतिनिधी :-
  कोपरगाव तालुक्यातील वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता ही वाढती साखळी तोडण्यासाठी शहरातील राजकीय नेते, व्यापारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या मागणीस्तव कोपरगाव प्रशासनाकडून २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून सर्व शहर चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 
    या बंदचा आजच्या पहिल्या दिवशी कोपरगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.


   कोपरगावात आरोग्य विभागातर्फे शहरातील उपनगरात ज्या भागात जास्त संख्या वाढतेय अशा सर्व विभागाची घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करत आज सकाळ पासूनच कोपरगावातील टिळकनगर काळेमळा सप्तश्री मळा विवेकानंदनगर आदी भागातील सुमारे ७५० कुटुंबातील ३५०० च्या आसपास नागरिकांची घरोघरी जावून तपासणी करण्यात आली आहे.त्यात ज्या व्यक्तीना काही लक्षणे दिसली त्यांना  एस.जी.विद्यालयात नेऊन त्यांची रँपिड अँटीजन किट द्वारे तपासणी करण्यात आली त्यात ८  नागरिक कोरोना पाॅझिटिव्ह आढळुन आले आहे.
     या आरोग्य विभागाच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णयामुळे येणाऱ्या काही दिवसांत पॉजिटीव्ह रुग्णाची संख्या वाढतांना दिसेल परंतु या मुळे वाढती कोरोना साखळी लवकर तोडण्यास मदत नक्कीच होऊ शकते.