Breaking News

देवळाली प्रवरातील रुग्णालयातील परीचारीकेसह वैद्यकीय विद्यार्थी वयोवृद्ध कोरोना बाधीत !

देवळाली प्रवरातील रुग्णालयातील परीचारीकेसह वैद्यकीय विद्यार्थी वयोवृद्ध कोरोना बाधीत

त्या राजकीय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ञास न देण्याचा सल्ला 
देवळाली प्रवारा प्रतिनिधी 
                    देवळाली प्रवरा येथील एका वस्तीवरील राजकीय क्षेञातील एकाच कुटुबातील चार व्यक्ती कोरोना बाधीत आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एका रुग्णालयातील डाँक्टरासह त्यांच्या कुटुंबाची व रुग्णालयातील परीचारीकांचे स्ञाव तपासणीसाठी घेतले असता डाँक्टरांच्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तीसह एक परीचारीका कोरोना बाधीत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. तर राहुरी कारखाना  येथील वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी असे एकुण तीन व्यक्ती कोरोना बाधीत आढळले आहेत. त्या राजकीय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या औषध दुकानदारास स्ञाव तपासणी करण्यास सांगितले असता त्या राजकीय बाधीत रुग्णाकडून आमच्या माणसांना स्ञाव घेण्यासाठी ञास देवू नका असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांस दिला आहे. 
                       देवळाली प्रवरात व राहूरी फॅक्टरी परिसरात  कोरोनाचे एकूण 18 रूग्ण सापडले असता त्यातील 11 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. यातील पशु वैद्यकीय क्षेत्रातील एकावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात  उपचार सुरू असताना मृत्यू झाला.  6 रुग्णांवर उपचार चालू आहेत.
 राजकीय क्षेञातील कुटुंबातील चार रुग्ण कोरोना बाधीत आढळल्या  नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला असता देवळाली प्रवरा येथील एका रुग्णालयातील परीचारीका तर त्याच रुग्णालयाच्या  डाँक्टरच्या कुटुंबातील वयोवृद्ध  व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे आढळले आहे.वैद्यकीय शिक्षण घेणारा राहुरी कारखाना येथील विद्यार्थी  कोरोना बाधीत आढळला आहे. 
                  या राजकीय नेत्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत असताना प्राथमिक वैद्यकीय अधिकारी आण्णासाहेब मासाळ यांनी त्या राजकीय व्यक्तीचा औषध दुकानदार यांच्याशी संपर्क आल्याने  त्या औषध दुकानातील चौघांना स्ञाव तपासणी करुन घेण्यास सांगितले असता औषध दुकानदाराने त्या राजकीय व्यक्तीस भ्रमणभाषवर संपर्क साधुन  प्राथमिक  आरोग्य केंद्राचे वैद्यकीय  मासाळ  स्ञाव तपासणीसाठी ञास देत आहे. असे सांगितले त्या राजकीय व्यक्तीने डॉ.मासाळ यांना भ्रमणभाषवर संपर्क साधुन आमच्या लोकांना विनाकारण ञास देत आहात.हे तातडीने थांबवा  नाहीतर परीणाम वाईट होतील असे तो राजकीय व्यक्ती बोलल्याने डाँ.मासाळ यांनी कोरोना बाधीत  रुग्णाच्या संपर्कात आलेल्या  व्यक्तींचा शोध घेणार नाही. यापुढे कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध नगर पालिकेने घ्यावा या पुढे कोणत्याही व्यक्तींचा शोध घेतला जाणार नाही असे ही डाँ.मासाळ यांनी सांगितले.