Breaking News

सुशांतसिंह राजपूतला मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Sushant Singh Rajput case: Supreme Court verdict evokes political reactions  in Bihar

- सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान

नवी दिल्ली / प्रतिनिधी

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतला मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान समजला जातो. दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून ही माहिती देण्यात आली.

‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड 2021 सोहळ्यात सुशांतला मरणोत्तर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मात्र, हा सोहळा नेमका कोणत्या दिवशी रंगणार याची तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही. गेल्या महिन्यात कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीतर्फे सुशांतला मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार सुशांतची बहीण श्‍वेता सिंह किर्तीने स्वीकारला होता. याविषयी तिने सोशल मीडियावर माहितीदेखील दिली होती. बॉलिवूड हंगामा या पाक्षिकाच्या वृत्तानुसार, सुशांतच्या चित्रपटांसाठी खास एका वेगळ्या फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. सुशांतच्या मृत्यूमुळे संपूर्ण कलाविश्‍वाला हादरा बसला आहे. विशेष म्हणजे त्याच्या मृत्यूनंतरदेखील त्याच्यावर प्रेम करणारे असंख्य जण आहे. तसेच त्याला आता जो मान, सन्मान मिळतो तो यापूर्वी मिळायला हवा होता. परंतु, तो मिळाला नाही. त्यामुळेच आता त्याच्यासाठी सरकारद्वारे खास फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.