Breaking News

पारनेर आज तालुक्यातील ४ अहवाल पॉझिटिव्ह २० निगेटिव्ह !

पारनेर आज तालुक्यातील ४ अहवाल पॉझिटिव्ह २० निगेटिव्ह.
----------
सुपा जवळा कान्हूर पठार येथे वाढत आहे कोरोनाचा संसर्ग!
----------
तालुक्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१ वर.
---------



पारनेर प्रतिनिधी -
   पारनेर तालुक्यातील दि ३० रोजी सकाळी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार तालुक्यातील ४ अहवाल पॉझिटिव्ह तर २० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील पॉझिटिव्ह अहवालामध्ये मध्ये कानूर पठार २ रांजणगाव मशिद १ सुपा १ या गावातील अहवालांचा समावेश आहे तर निगेटिव्ह अहवालामध्ये पारनेर ६ जवळा ७ कान्हूर पठार ३ निघोज २ अळकुटी १ भोयरे गांगर्डा १ या गावातील अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
    पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना चा संसर्ग वाढत आहे तालुक्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २१ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ७५० हून अधिक कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.
रॅपिड किट सध्या उपलब्ध नसल्याने संसर्गात आलेल्या रुग्णांची तपासणी करण्याची गती मंदावली आहे त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्याही कमी येत आहे मात्र रॅपिड किट उपलब्ध होतच संख्या वाढण्याची शक्यता आहे.
     तालुक्यातील जवळा कान्हूर पठार सुपा याठिकाणी कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे मात्र याकडे तेथील नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे अद्याप दिसून येत आहे.
तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत ते रुग्ण राहत असलेल्या १०० मीटर चा परिसर १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.