Breaking News

ओम साई मित्र मंडळ करणार घरगुती गणपती उत्सव साजरा !

ओम साई मित्र मंडळ करणार घरगुती गणपती उत्सव साजरा
करंजी प्रतिनिधी-
   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील ओम साई मित्र मंडळातील सर्व सदस्य या वर्षी गणपती उत्सव न करता प्रत्येकाचे घरात साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे निवेदन मंडळाच्या वतीने संवत्सर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांना देण्यात आले.
  ओम साई मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात वेगवेगळे सामाजिक उपक्रम आयोजित करत गणपती उत्सव साजरा केला जातो परंतु या वर्षी वाढता कोरोना संसर्ग अजराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाय म्हणून सामाजिक बांधिलकी विचारात घेता या वर्षी २२ ऑगस्ट पासून सुरू होणार गणेशोत्सव सार्वजनिक रित्या साजरा न करता प्रत्येक सभासदाने आपआपल्या घरात श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठा करून साजरा करण्याचे एकमताने ठरवून तसे निवेदन ग्रामसेवक याना देण्यात आले.
     या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष राहुल पांडव, अध्यक्ष अमित गायकवाड,उपाध्यक्ष तुषार बिडवे व सुरज देवतरसे यांच्या सह्या आहे.