Breaking News

अकोल्यात कोरोनाचा पुन्हा धक्का, एकाच दिवशी सापडले २५ पॉझिटिव्ह !

अकोल्यात कोरोनाचा पुन्हा धक्का !एकाच दिवशी सापडले २५ पॉझिटिव्ह
अकोले प्रतिनिधी :
     अकोले तालुक्यात आज कोरोना ने पुन्हा धक्का  दिला एकाच दिवशी आज २५ करोना  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
     खानापुर कोविड सेंटरमध्ये आज गुरुवारी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमधील अहवालात  अकोले शहरातील तब्बल ०७ व्यक्ती ,हिवरगाव आंबरे येथील ०४ व ब्राम्हणवाडा येथील ०१ अशा  १२ व्यक्ती  चा अहवाल पॅाझिटीव्ह आला.
     तर अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात 
 ब्राम्हणवाडा येथील   ५५ वर्षीय पुरुष, ७७ वर्षीय महिला,  इंदोरी येथील ५६ वर्षीय  पुरुष,  कळस येथील २५ वर्षीय तरुण व , ४४ वर्षीय महीला,  लहीत येथील ३२ वर्षीय  पुरुष,   मेहंदुरी येथील ५२ वर्षीय पुरुष,  चास येथील ४४ वर्षीय  पुरुष अशा  आठ जणाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
     तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात नवलेवाडी येथील अकोले कॅालेज जवळील ४९ वर्षीय पुरुष,व २१ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय  , ४६ वर्षीय  , व २३ वर्षीय  महीला अशा  ०५ व्यक्ती पॅाझिटीव्ह  आढळल्या आहेत 
आज दिवसभरात  एकुण २५ व्यक्ती कोरोना बाधीत  आढळून आले यामुळे  तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ३५१ झाली असून करोना बाधित मृतांची संख्या ९ झाली आहे.
---------