Breaking News

पत्रकारितेत "नंदकुमार कुरुमकर" यांचे योगदान लाख मोलाचे माजी नायब तहसीलदार वेताळ !

पत्रकारितेत "नंदकुमार कुरुमकर" यांचे योगदान लाख मोलाचे माजी नायब तहसीलदार वेताळ
काष्टी :- 
लिंपणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचे पत्रकारितेत योगदान लाखमोलाचे आहे असे श्रीगोंद्याचे माजी नायब तहसीलदार रामचंद्र वेताळ यांनी सांगितले. लिंपणगाव चे ग्रामपंचायत सदस्य सौ ताराबाई वेताळ, जय जवान जय किसान बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष किरण कुरुमकर यांच्या वतीने कुरुमकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वेताळ यांनी सांगितले की कुरुमकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. या क्षेत्रात त्यांनी वीस वर्षे पूर्ण केले आहे त्यांची लेखणी अभ्यासपूर्ण असते अशा लेखणीतून समाजाला चांगला फायदा झाला आहे यामध्ये रस्ते, पाणी, कृषी, राजकीय, धार्मिक, विज, शेतकरी यासारख्या विषयांमध्ये त्यांची फार मोठी हातोटी आहे असेही वेताळ यांनी सांगितले.
     यावेळी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किरण कुरुमकर यांनी बोलताना सांगितले की नंदकुमार कुरुमकर यांनी आपल्या लेखणीतून अनेक प्रश्नांना वाचा फोडली वृत्तपत्र हातात घ्यावे त्यात कुरूमकरांची बातमी वाचावी अशा बातम्या असतात त्यांनी बातम्यांना वेगळ रूप बनविण्याचा प्रयत्न केला. लिंपणगाव चे वैभव कुरुमकर यांच्याकडून मिळाले असेही त्यांनी सांगितले.
      यावेळी जय जवान जय किसान बहुउद्देशीय संस्थेचे सचिव नितीन सुपेकर, सहसचिव महादेव ओव्हाळ, सिद्धेश्वर दूध डेअरी चे चेअरमन महेश रेवगे विश्वस्त दिलीप रेवगे, अजित ससाने, हर्षद झिटे, शुभम जामले, नितीन कुरुमकर व सौ पूजा उपस्थित होते.