Breaking News

सप्टेंबरमध्ये लॉकडाउन कायमचा हटवणार?

Uddhav to Take Oath as CM, NCP Gets Deputy CM, Speaker from Cong

- ठाकरे सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत

- बुधवारच्या बैठकीत ई-पासवर निर्णय शक्य

मुंबई/ प्रतिनिधी 

देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाउन आहे. पण, देशाची आर्थिक बाजू आणि उद्योगांवर होत असलेल्या परिणामामुळे केंद्र सरकारने काही अटी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे राज्याअंतर्गत वाहतूक आता मोकळी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिना संपत आला असून, त्यामुळे येणार्‍या सप्टेंबर महिन्यात लॉकडाउनचे बरेच निर्णय मागे घेतले जाण्याची चिन्ह आहे.

येत्या बुधवारी मुंबई महाविकास आघाडी सरकारची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये लॉकडाउनमधून लोकांची सुटका करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. राज्यात मार्च महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याअंतर्गत वाहतूक ही पूर्णपणे बंद होती.  वाहतूक बंद असल्यामुळे राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे केंद्राने राज्यातील अंतर्गत वाहतुकीवर असलेली बंदी उठवण्याचे आदेश  दिले होते. त्यानंतर 20 ऑगस्टपासून एसटी बससेवा सुरू झाली. लालपरी तब्बल 5 महिन्यानंतर पुन्हा एकदा धावायला लागली आहे. परंतु, खासगी वाहनांना ई-पास अजूनही कायम आहे. दरम्यान, केंद्राने वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्र आलेले असले तरी प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती ही वेगळी असते. याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच घेतला जाणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बुधवारी होणार्‍या या बैठकीमध्ये खासगी वाहनांना ई-पास कायम ठेवायचा की, नाही याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.


राज्यात ई-पासची अट कायम

केंद्र सरकारने सर्व राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी कोणतीही बंधने असू नयेत, असे कळवले आहे. त्यानंतर राज्यात ई-पासबाबतचर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच ई-पासची अट हटवण्याबाबत मागणी देखील करण्यात आली होती. याच पृष्ठभूमीवरगृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात ई-पासची अट कायम राहील, असे स्पष्ट सांगितले आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या गाईडलाईन्स पुढील आदेशापर्यंत कायम राहतील, असे अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटले आहे.